पुणे : पुणेकरांना मोठ- मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यापार्श्वभूमीवर राजसाहेबांनी आदेश दिला तर मी पुणे लोकसभेची निवडणूक लढवू शकतो, असे सूचक विधान महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी केले.
अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले.
राजसाहेबांनी आदेश दिल्यास पुणे काय बीडमध्येही मी लाेकसभेची निवडणूक लढवू शकताे. मात्र, मी स्वत:हून लाेकसभा निवडणुकीसाठी उभे राहण्याचा अद्याप विचार केलेला नाही’, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान यावेळी पत्रकार परिषदेला मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, मनविसेचे गजानन काळे, प्रशांत कनोजिया उपस्थित होते.आगामी काळात मनविसेने प्रत्येक विद्यापीठाची सिनेट निवडणूक लढवण्यासोबतच, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मोर्चे काढण्यासाठी तयार असल्याचेही अमित ठाकरे म्हणाले.