नागपूर: लोकसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपने राज्यातील २३ जागांसाठी निरीक्षक नेमून मित्रपक्षांची डोकेदुखी वाढवली आहे. गेल्या २०१९ च्या निवडणुकांमध्ये भाजपने ज्या जागा जिंकल्या होत्या. त्याच जागांवर भाजपने निरीक्षक नेमले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन उपमुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली होती.
‘मिशन ३७०’साठी भाजपला महाराष्ट्रातून मित्रपक्षांसह ४२ हून अधिक जागा जिंकायच्या आहेत.
भाजपने २०१९ च्या निवडणुकीत राज्यात २३ जागांवर विजय मिळविला होता. याच जागांवर भाजपने विजय मिळविला होता.
मनोज कोटक व अमर साबळे यांना नागपूरच्या निरीक्षकपदी नेमण्यात आल्याची माहिती आहे. भाजपाकडून नेमण्यात आलेल्या या निरीक्षकांकडून त्यांच्या मतदारसंघात जाऊन तेथील पदाधिकारी, इच्छुक उमेदवारांशी चर्चा करून आढावा घेतील, अशी माहिती आहे.