नागपुर : आज ४ तारखेला नागपूर येथे राष्ट्रीय नमो युवा महासंमेलनाला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वीजी सुर्या, भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील, भाजयुमो प्रदेश अध्यक्ष राहुल लोणीकर, भाजप महानगराचे अध्यक्ष जितेंद्र उर्फ बंडी कुकडे, जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे, आमदार कृष्णा खोपडे, प्रविण दटके, मोहन मते, विकास कुंभारे, प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, धर्मपाल मेश्राम, विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे, भाजयुमो शहर अध्यक्ष बादल राऊत हे उपस्थित असतील. संमेलनासाठी राज्यभरातील १८ ते ३५ वयोगटातील १ लाख युवक सहभागी होतील.
लोकसभा निवडणुकीच्या पुर्वी मध्य भारताच्या नागपुरात हे भव्य युवकांची संम्मेलन आयोजित करण्यात आलेले आहे.
संमेलनाच्यास्थळी विशालकाय मंडप बनविल्या गेलेला आहे. एक लाख युवकांची व्यवस्था केलेली आहे. संम्मेलनाला एक लाख युवकांपेक्षा जास्ती सम्मेलीत होण्याची अपेक्षा आहे. संम्मेलन स्थळी वैद्यकीय सेवा, ॲम्युलंसेस, पाण्याचे स्टॅाल्स विवीध ठिकाणी लावण्यात आले आहे. मैदानात येण्याकरीता २ रस्ते आहेत. विद्यापीठ प्रशासकीय इमारतीसमोरील गेट व अनरावती रोडवरील विद्यापीठाचे गेट असे दोन मार्ग आहेत.