नवी दिल्ली:आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग लवकरच निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकतात.याकरिता राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे.काँग्रेसने त्यांच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण ४३ उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
भाजपाने गेल्या आठवड्यात त्यांच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या यादीत भाजपाने एकूण १९५ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.त्यापाठोपाठ काँग्रेसने ८ मार्च रोजी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत एकूण ३९ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेसने मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांना छिंदवाडामधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे.
काँग्रेसच्या आजच्या यादीत आसाम, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तराखंड, दीव-दमण आणि राजस्थानच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या 43 उमेदवारांमध्ये 7 जनरल, 13 ओबीसी, 10 एससी, 9 एसटी आणि 1 मुस्लिम उमेदवाराचा समावेश आहे. काँग्रेसने राजस्थानच्या 25 जागांपैकी 10 जागांसाठी उमेदवार घोषित केले आहेत. यामध्ये बिकानेर येथून गोविंद मेघवाल, चुरु येथून राहुल कस्वा, झुंझुनू येथून बृजेंद्र ओला, अलवर येथून ललित यादव, भरतपूर येथून संजना जाटव. टोंक येथून हरीश मीणा, जोधपूर येथून करण सिंह उचियारडा, जालौर सिरोही येथून वैभव गहलोत, उदयपूर येथून ताराचंद मीणा, चितौड येथून उदयलाल आंजना यांचा समावेश आहे.
काँग्रेसने मध्यप्रदेशातील 10 जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये छिंदवाडा येथून नकुलनाथ, भिंड येथून फूल सिंह बरैया, टीकमगढ येथून पंकच अहिरवार, सतना येथून सिद्धार्थ कुशवाह, सीधी येथून कमलेश्वर पटेल, मंडला येथून ओंकार सिंह मरकाम, देवास येथून राजेंद्र मालवीय, धार येथून राधेश्याम मुवेल, खरगोन येथून पोरलाल खरते, बैतूल येथून रामू टेकाम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या उमेदवाराचा समावेश नाही-
काँग्रेसने जाहीर केलेल्या दोन्ही यादीत महाराष्ट्रातून एकही उमेदवाराचा समावेश नाही. कारण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. महाविकास आघाडीत सध्या जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे जोपर्यंत महाविकास आघाडीचे जागावाटप होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील काँग्रेसचे उमेदवार जाहीर होऊ शकणार नाहीत.