नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर अखेर जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. यंदा ५४३ जागांवर लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी, दुसरा टप्पा २६ एप्रिलला, तिसरा टप्पा ७ मे रोजी, चौथा टप्पा १३ मे रोजी, पाचवा टप्पा २० मे रोजी सहावा टप्पा २५ मे रोजी तर सातवा आणि अखेरचा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे.
४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे, असे आयुक्त राजीव कुमार म्हणाले.
पहिल्या टप्प्यात २१ राज्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची निवडणूक प्रक्रिया पार पडत असून ९७.८ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे यावेळी मुख्य निवडणूक आयुक्तांनी म्हटलं. त्यामध्ये, १.८२ कोटी नवीन मतदार आहेत.देशात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी सर्वोतोपरी काळजी घेण्यात आली आहे. देशातील ९७.८ कोटी मतदारांपैकी ४९.७ कोटी पुरुष तर ४७.१ कोटी महिला मतदानाचा हक्क बजावतील. तर, ४८ हजार तृतीयपंथी मतदान करतील. त्यासाठी, ५५ लाख ईव्हीएम मशिन मतदानासाठी सज्ज असल्याचंही कुमार यांनी सांगितले.
महाराष्ट्रात ‘या’ तारखेला होणार निवडणुका-
महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. म्हणजेच महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल.गेल्या वेळेस राज्यात चार टप्प्यांत निवडणुका झाल्या होत्या.