Published On : Tue, Mar 26th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट सुरू असताना राडा

नागपूर : ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट सुरू असताना नागपुरात मोठा राडा झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

चित्रपट सुरू असताना काही तांत्रिक अडचण आल्याने इंटरवलनंतर चित्रपटाच्या प्रक्षेपणामध्ये अडथळा आल्याने प्रेक्षकांनी आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर प्रेक्षकांनी चित्रपटगृहात गोंधळ घालत आपले पैसे परत मागितले. चित्रपट व्यवस्थापनानं समजूत काढून देखील प्रेक्षक शांत होत नसल्यानं अखेर चित्रपट व्यवस्थापनाला काही प्रेक्षकांचे पैसे परत करावे लागले.

Gold Rate
Monday 10 Feb. 2025
Gold 24 KT 85,600 /-
Gold 22 KT 79,600 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपुरातील तुली आयनॉक्स या चित्रपटगृहात ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट सुरू होता.

मात्र चित्रपट सुरू असताना काही तांत्रिक अडचण आल्यानं इंटरवलनंतर चित्रपटाच्या प्रक्षेपणामध्ये अडथळा आला, चित्रपट नीट चालला नाही, त्यामुळे प्रेक्षक संतापले. सोमवारी साडेनऊच्या दरम्यान ही घटना घडल्याने चित्रपटगृहात एकच खळबळ उडाली.

Advertisement