Published On : Fri, Mar 29th, 2024
By Nagpur Today Nagpur News

धक्कादायक; नागपुरात ७ वर्षीय चिमुकलीवर जंगलात नेऊन अत्याचा, आरोपीला अटक

नागपूर : शहरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. नराधमाने आठवडी बाजारातून अपहरण केलेल्या ७ वर्षीय चिमुकलीवर जंगलात नेऊन अत्याचार केला.वैद्यकीय तपासणीतून अशी धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणी कळमना पोलिसांनी आरोपीविरूध्द अपहरण आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. सुरेंद्र पराये (२९) रा. अजनी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने २ एप्रिल पर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावली.

माहितीनुसार, आरोपी सुरेंद्र हा मुळचा बिडीपेठ येथील रहिवासी आहे.तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. मात्र बायकोशी पटत नसल्याने अजनी परिसरात वेगळे राहतो. सध्या तो अजनी परिसरात राहात असून नुडल्स बनविण्याचे काम करतो.
घटनेच्या दिवशी तो दुचाकीने भटकत भटकत गुलशननगरातील आठवडी बाजारात गेला. पसंत केलेल्या कपड्याचे पैसे देतो अशी बतावणी करून चिमुकलीचे अपहरण केले.

Gold Rate
Monday 10 Feb. 2025
Gold 24 KT 85,600 /-
Gold 22 KT 79,600 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दुचाकीवर बसवून तिला जवळपासच्या जंगलात घेऊन गेला. अत्याचार केल्यानंतर तो अजनी परिसरात आला. त्याने दारू पिण्यासाठी एका मित्राला बोलाविले. दारू पिल्यानंतर त्याच्या दुचाकीचे पेट्रोल संपल्याने तो दुचाकी ढकलत असताना चिमुकली रडत होती.जवळून जात असलेल्या पोलिसाला याबाबत संशय आला. सक्करदरा पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

Advertisement