मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु झाल्या आहेत. आता शिवसेना (ठाकरे गट) नेते तथा खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
आपण मुंबईत 10 सभा घ्या नाहीतर 50 सभा घ्या. पण मुंबईच्या जनतेने निश्चित केले आहे. यावेळी भाजप सर्वात आधी मुंबईतून तडीपार.
देशात तर होणारच. मात्र आपण मुंबईवर ज्या पद्धतीने अन्याय केला आहे, मुंबई लुटण्याचा प्रयत्न केला आहे, मुंबई लुटून गुजरातला घेऊन जाण्याची, मुंबईतील मध्यमवर्गियांसोत जो छळ कपट केला आहे, त्यामुळे नरेंद्र मोदी येथे येऊन काय बोलणार? अशा शब्दात मोदींनी संताप व्यक्त केला. ज्या पद्धतीने आपला धारावीसह मुंबईही अदानींना विकण्याचा कट आहे, असे आरोप करत, मुंबईकरांनी आपल्या मते का द्यावीत? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.
मोदींना अजूनही वाटत आहे की ते पंतप्रधान आहेत. मात्र लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आपण आता पंतप्रधान नाही. जेव्हा निवडणूक जाहीर होते, तेव्हा आपण जास्तीत जास्त कार्यवाहक पंतप्रधान असतात. पण आपण त्याच पद्धतीने फिरत असाल आणि घोषणा करत असाल, लोकांना धमक्या देत असाल, तर हे चालणार नाही, असेही राऊत म्हणाले.