Advertisement
नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाचा जाळ्यात ओढून तरुणीवर अत्याचार करणाऱ्या युवकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रशिक अविनाश झोडापे (वय २४, रा. अंबाझरी टेकडी, बुद्ध विहाराजवळ) असे आरोपीचे नाव आहे.
माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी प्रशिकशी २०२१ मध्ये ओळख झाली. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. यादरम्यान त्याने युवतीला घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तिला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर तिचे अश्लिल फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत दिली.
मात्र लग्न करण्यास नकार दिला. पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून प्रशिक विरोधात गुन्हा दाखल केला प्रकरणाचा पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.