नागपूर : दोन दिवसांपूर्वी नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात B.Sc नर्सिंगच्या एका विद्यार्थिनीच्या आत्महत्येचा प्राकार घडलेला आहे. ही घटना अतिशय दुख:द असून यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नागपूर महानगर शोक व्यक्त करते. या घटनेमुळे संपूर्ण महाविद्यालयात एक तणावाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. यापूर्वी देखील अशा प्रकारच्या दोन घटना महाविद्यालयात घडल्या आहे.
ही अतिशय निंदनीय बाब आहे. या पूर्वी दोन घटना घडल्या नंतरही महाविद्यालयात आणखीन एक घटना घडते. या प्रकरणी सुद्धा महाविद्यालय प्रशासन शांत का? त्या वर कुठलीही चौकशी करण्यात आलेली नाही किंवा अजूनही स्पष्टता देण्यात आलेली नाही.
त्यामुळे या सर्व प्रकरणाला लक्षात घेऊन अभाविप नागपूर महानगर कडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्य यांना निवेदन देण्यात आले या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी लवकरात लवकर चौकशी समितीचे गठन करून, निष्पक्षपणे चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली. या पत्रकार परिषदेला नागपूर महानगर सहमंत्री नुपूर देशपांडे, प्रांत फार्माविजन संयोजक आदित्य पिसे व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.