नागपूर: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नाराजीनाट्य सुरु झाले.महायुतीत मित्रपक्षची भूमिका बजावणारे बच्चू कडू अचानक सरकारवर नाराज असल्याचे बोलले जात आहे.
अमरावतीनंतर अकोल्यातील महाविकास आघाडीतील काँग्रेस उमेदवाराला कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने जाहीर पाठिंबा दिला
अमरावतीमध्ये भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली.मात्र या उमेदवारीला कडू यांनी विरोध दर्शविला.
कडू यांच्या प्रहारने नवनीत राणा यांच्याविरोधात दिनेश बूब यांना उमेदवारी देऊन भाजपला पहिला धक्का दिला होता.आज अकोल्यात प्रहार जनशक्ती पक्षाचा जिल्हा मेळावा झाला.त्यात जिल्हा कार्यकारिणीने काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांना पाठिंबा देण्याची मागणी बच्चू कडू यांच्याकडे करण्यात आली आहे.
अकोल्यातले भाजप आमदार रणधीर सावरकर यांना धक्का देत काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे प्रहारचे जिल्हाध्यक्ष कुलदीप पाटील वसू यांनी जाहीर केले. रामटेकमध्येही काँग्रेसचे उमेदवार श्याम कुमार बर्वे यांना बच्चू कडू यांनी पाठिंबा दिल्यामुळे महायुतीत खळबळ उडाली आहे.