बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांचे नाव न घेतला टीका केली आहे.भाजपने सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल केली आहे. हा पक्ष सर्वसामान्यांची हिते जपासणारा पक्ष नाही. तुम्हाला बारामतीकरांनी त्यांच्याबरोबर जाण्यासाठी मते दिली नाहीत. असा टोला शरद पवारांनी अजितदादांना लगावला आहे.
सोमवारी (दि ८) शरद पवार यांनी जिरायती भागाचा दाैरा केला. यावेळी उंडवडी क.प. येथे आयोजित सभेत पवार यांनी मोदी सरकारसह अजित पवारांना धारेवर धरले. विधानसभेला बारामतीकरांनी राष्ट्रवादीला मते दिली. जनतेनी ही मते भाजपसोबत जाण्यासाठी दिली नाही. मात्र त्यांनी निवडलेला रस्ता चुकीचा असल्याचे पवार म्हणाले.
नरेंद्र मोदी मुख्यमंत्री पदापासून पंतप्रधान पदापर्यंत पोहचले. त्यांच्या गुजरातला केंद्रात कृषिमंत्री असताना प्रचंड मदत केली.तेव्हा मी पक्षपात अजिबात केला नाही. राज्यातील शेतकरी सुखी करण्यासाठी मदत करण्याचे धोरण नेहमी राबविले.पंतप्रधान मोदी बारामतीत आले असतांना माझ बोट धरुन शरद पवारांनी शिकविल्याचे सांगितले.आज तेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वेगळी भुमिका घेतात. त्यांच्यावर टीेकाटीप्पणी करणाऱ्या झारखंड, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकतात. हि लोकशाही नाही,तर हुकुमशाही असल्याचा घणाघात पवार यांनी केला.