नागपूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काल नागपुरात दाखल झाले.
रामटेक, नागपूर आणि भंडारा गोंदिया या तीन लोकसभा मतदारसंघासाठीची मोदींची कन्हान येथे सभा आयोजित करण्यात आली होती.
नागपूर विमानतळावर पंतप्रधान मोदी दाखल होताच त्यांचे भाजप नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जल्लोष स्वागत केले. यावेळी महाराष्ट्र भाजपचे सोशल मीडिया सहसंयोजक सरदार लक्की सिंग यांनीही मोदींची भेट घेतली. या भेटीमुळे लक्की सिंग भारावले होते. ‘नागपूर टुडे’शी बोलतांना लक्की सिंग म्हणाले की, आयुष्यात एकदा तरी पंतप्रधान मोदी यांना मी भेटावे असे माझ्या आजीला वाटायचे.
आज प्रत्यक्षात ती इच्छा पूर्ण झाल्याने मी भारावून गेलो.मोदी विमानतळावर उतरताच त्यांना नमस्कार केला आणि आजी ही इच्छा बोलून दाखवली. तेव्हा त्यांनी माझ्या पाठीवर थाप देत ‘व्वा’ असे म्हटल्याचे लक्की सिंग म्हणाले.पंतप्रधान मोदींसोबतची ही भेट अविस्मरणीय असल्याचेही ते म्हणाले.