Advertisement
नागपूर : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे आज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सपत्नीक आगमन झाले.
राज्यपाल रमेश बैस यांनी उभयतांचे स्वागत केले. स्थानिक प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सहपोलीस आयुक्त अस्वती दोरजे,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार यांची यावेळी उपस्थिती होती.
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर आकदमीत (एनएडीटी) प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या भारतीय महसूल सेवेच्या अधिकाऱ्यांच्या ७६ व्या तुकडीच्या निरोप प्रसंगी उपराष्ट्रपती हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.