पुणे: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली.यातच भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे हे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहेत.पुण्यातील मोदी बागेत भेट घेऊन
ताकवणे यांनी शरद पवार यांच्याशी याबाबत चर्चा केली. पवार यांच्या उपस्थितीमध्ये नामदेव ताकवणे आज यवत मधील सभेत पक्षात प्रवेश करणार आहेत.
राहुल कुल यांच्यावर भीमा पाटस साखर कारखाना प्रकरणात नामदेव ताकवणे यांनी गंभीर आरोप केले होते.
मात्र आता राहुल कुल हेच भाजपात आल्यानं नामदेव ताकवणे हे पक्षावर नाराज असल्याची माहिती असल्याने ते पक्षाची साथ सोडणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात असून ताकवणे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची ताकद वाढणार आहे.
बारामतीतही शरद पवार यांच्या पक्षात पक्षप्रवेशाचे वारे वाहू लागले आहे. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे थेट वंशज भुषणसिंह राजे होळकर राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणार आहेत.