नागपूर :लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला उद्या नागपूरमधून सुरुवात होणार आहे.यासोबतच इतर चार मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडेल. याच दिवशी नागपूरच्या शेजारचा जिल्हा वर्धा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा होणार आहे.
त्यामुळे मोदींची प्रचार सभा नागपूरच्या मतदारांना प्रभावित करू शकते. वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथे दुपारी ही सभा आहे. तेथून मोदी नागपूरला येतील.
वर्धेसह उर्वरित पाच मतदारसंघ असून याठिकाणी २६ एप्रिलला मतदान आहे. तेथे प्रचार शिगेला पोहोचला आहे. नागपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यातील अंतर ८० किलोमीटर पेक्षा कमी आहे.
हे पाहता नागपूरमध्ये मतदानाच्या दिवशी शेजारच्या वर्धा मतदारसंघात होणारी मोदींची प्रचार सभा नागपूरच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रभावी ठरणार आहे.