नागपूर: महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात होत असलेल्या निवडणुकीत सायंकाळी ५ वाजतापर्यंत मतदानाची टक्केवारी घसरल्याचे चित्र आहे. नागपूरमध्ये ४७.९१ टक्के तर रामटेकमध्ये ५२.३८ टक्के मतदान झाले.
गडचिरोली-चिमूरमध्ये जोरदार मतदान होत असून, ६४.९५% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
भंडारा-गोंदियामध्ये ५६.८७ टक्के मतदारांनी मतदान केले, तर चंद्रपूरमध्ये ५५.११ टक्के मतदान झाले.
राज्याच्या दुसऱ्या राजधानीत उष्णतेमुळे मतदारांचा उत्साह ओसरल्याचे दिसून येत आहे, कारण सायंकाळी ५ वाजेपर्यंत विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी मतदान नागपूरमध्ये झाले आहे.