नागपूर : सेकंडरी एज्युकेशन (CBSE) CBSE 10 वीचा निकाल आज म्हणजे 1 मे रोजी जाहीर होणार अशी नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाली.
या खोट्या नोटिफिकेशनमुळे आज सकाळपासूनच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला होता. मात्र केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे CBSE निकाल आज जाहीर करण्यात आलेला नाही,असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तसेच 20 मे नंतर निकाल जाहीर होणार अशी माहितीही मंडळातर्फे देण्यात आली.
CBSE 10वीच्या निकालासंबंधीची अधिसूचना आता CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. ज्या उमेदवारांनी दहावीची परीक्षा दिली आहे ते अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर त्यांचे निकाल पाहू शकतात.
CBSE निकाल 2024 तपासण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना CBSE रोल नंबर आणि जन्मतारीख आवश्यक आहे .