Advertisement
नागपूर: शहरात अतिक्रमणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. एनआयटीच्या कार्यवाहीनंतरही अतिक्रमण काढलेल्या मोकळ्या जागांवर पुन्हा अतिक्रमण होत असल्याचे चित्र दिसत आहे. नागपूर सुधार प्रण्यास (NIT) ने गेल्या शुक्रवारी जयगुरुदेव नगर मधील अतिक्रमण वर कार्यवाही केली. मात्र चार दिवस उलटूनही रस्त्यावर मलबा उचलेले नही. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच स्थानिकांनी अतिक्रम कार्यवाहीनंतर पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण केले. त्यामुळे परिसरातील इतर लोकांना पुन्हा अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे पाहता अतिक्रमण वाल्यांना प्रशासनची भीती नसल्याचे स्पष्ट होते. तर दुसरीकडे याप्रकरणाची दखल घेतली जात नसल्याने नागपूर सुधार प्रण्यासचा भोंगळ कारभार पुन्हा उघडकीस आला आहे.