नागपूर: एकीकडे शहारात तापमानात वाढ झालेली असताना, दुसरीकडे आज सकाळी अवकाळी पावसान जोरदार हजेरी लावली.
हवामान खात्याने पुढील तीन तास नागपुरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.नागपूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसासह गविजांच्या कडकडाट 30-40 प्रतितास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाल्याने जनजीवन विस्कळित झाले.तर पुढील दोन दिवस विदर्भात बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने आज विदर्भातील गडचिरोल,चंद्रपुर, यवतमाळ,अकोला हे जिल्हे वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यात बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, येथे गारपीट, अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडाटास 40-50 प्रतितास सोसाट्याचा वारा येणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
एकीकडे राज्यात उष्णतेच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली असताना, दुसरीकडे मात्र पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पावसाळा अनुभवायला मिळतो आहे. भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यात मंगळवारला सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळं शेती पिकांसह, पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे.