नवी दिल्ली:मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर झाला. त्यांनतर त्यांनी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या राजकरणावर मोठे भाष्य करत भाजपाचा विजय झाला तर उद्धव ठाकरेसंह इतर नेते तुरुंगात जातील, असा गंभीर दावा केला.
पंतप्रधान मोदी हे एक राष्ट्र, एक नेता मोहीम सध्या राबवत आहेत. त्यामुळे त्यांनी मला तुरुंगात टाकून त्यांनी देशातील सर्व विरोधकांना याचा संदेश दिला आहे.
जर हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांना आम्ही तुरुंगात टाकू शकतो, तर ४ जून रोजी सत्ता आली तर देशातील कोणत्याही नेत्याला आम्ही तुरुंगात टाकू शकतो.
जर ते पुन्हा जिंकले तर ममता बॅनर्जी, एमके स्टॅलिन, तेजस्वी यादव, पिनाराई विजयन, उद्धव ठाकरे आणि इतर विरोधी नेते तुरुंगात जातील, असा आरोप केजरीवालांनी केला.