नागपूर :धरमपेठसारख्या पॉश परिसरात नुकत्याच झालेल्या स्थानिक आणि क्लबमध्ये पार्टीसाठीआलेल्या लोकांमध्ये बाचाबाचीचे प्रकरण समोर आले.या प्रकरणामुळे शिवाजी नगर आणि धरमपेठ या दोन्ही भागातील रहिवाशांना भेडसावणाऱ्या पार्किंगच्या समस्येचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या भोंगळ कारभार उघडकीस आला आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या म्हणण्यानुसार,नागपूर पोलिसांच्या आक्षेपानंतरही 200 मीटरच्या आत असलेली शाळा आणि स्थानिकांच्या हरकतींना न जुमानता प्रशासन शिवाजी नगरच्या परिसरातील क्लब, पब आणि बारना परवाने देत आहे.नागपूर पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांनी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर यासंदर्भांत माहिती दिली.
पोलिसांनी बार, क्लब किंवा दारू पुरवणाऱ्या आस्थापनांच्या 200 मीटरच्या आत असलेल्या शाळांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्या शा व्यवसायांच्या परवान्यासाठी स्थानिकांच्या हरकती आहेत. मात्र, प्रशासन त्यांना वैध परवाने वाटप करत असल्याची धक्कादायक माहिती आहे.
शिवाजी नगर परिसरातील पार्किंगच्या परिस्थितीबद्दल सूत्रांनी स्पष्ट केले की, हे परिसर “नो पार्किंग झोन” नाही. त्यामुळे पोलिस त्यांच्यावर कारवाई करू शकत नाहीत. तथापि, जर कोणी कोणाच्या प्रवेशद्वारावर गाडी पार्क करून अडथळेआणत असतील, तर पोलीस त्यांच्यावर नक्कीच कारवाई करतील.
दुसरीकडे हे नमूद कारण्यासारखे आहे की,राज्याच्या दुसऱ्या राजधानीत नाईट लाईफ पार्टी संस्कृती केंद्रस्थानी आल्याने पार्किंगची समस्या दिवसा असो वा रात्र नागरिकांना पार्किंगची भीषण समस्या भेडसावत आहे. धरमपेठ परिसरातील शिवाजी नगरमधील रहिवाशांनाही याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्यामुळे परिसरातील कल्बसमध्ये पार्टी करण्यासाठी जाणारे लोक त्यांच्या घरासमोरच पार्किंग करतात. याबाबत स्थानिकांनी तक्रारी करूनही प्रशासनाकडून अद्याप कोणतेही ठोस पाऊले उचलण्यात आलेली नाही. रविवारी रात्री शिवाजी नगर परिसरात स्थानिक आणि पार्टी करणाऱ्या लोकांमध्ये याच मुद्यावरून वाद पेटला. जिथे हे प्रकरण शिवीगाळ आणि मारहाणीपर्यंत वाढले. मात्र हे प्रकरण चिघळून अधिक हिंसक झाले तर ? हे पाहत असते दिसते की कदाचित प्रशासन काही दुर्दैवी घटना घडण्याची वाट पाहत असेल.
नागपूर टुडेशी बोलताना वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) शशिकांत सातव यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली असल्याची माहिती दिली. हा भाग सीताबर्डी आणि सोनेगाव वाहतूक क्षेत्रांतर्गत येतो. मी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांना रात्रीच्या वेळी परिसरातील गस्त वाढविण्याचे निर्देश दिले आहेत.आस्थापना मालकांना त्यांच्या ग्राहकांना पार्किंगची सुविधा देण्याचे निर्देश दिले असल्याचे डीसीपी म्हणाले.
– शुभम नागदेवे