Advertisement
नागपूर: शहरातील शासकीय रुग्णालय असलेल्या मेयो, मेडीकल. एम्स, डागा,सुपर स्पेशालिटी रूग्णालयात अपुरा रक्तसाठा असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रशासनाकडून रक्ताची भीषण टंचाई पाहता दात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याचे आवाहन केले जात आहे. याला प्रतिसाद देत नागपूर पोलिसांनी मदतीचा हात पुढे करत बेलेतरोडी पोलीस स्टेशन मध्य. रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलेल्या या उपक्रमाचा उद्देश रक्ताअभावी कोणत्याही रुग्णाला त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचा आहे.सामुदायिक भावना आणि समर्पणाच्या उल्लेखनीय प्रदर्शन करत नागपूर पोलिसांनी शहरातील रुग्णालयांमध्ये रक्ताच्या कमतरतेच्या गंभीर संकटात मदत केल्याने त्यांचे स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.