Advertisement
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी बोर्डाच्या परीक्षेच्या निकाल २७ मे रोजी जाहीर होणार आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या मुंबईतील पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली. मात्र, बोर्डाच्यावतीने याबद्दलची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
मार्च-एप्रिल २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालाच्या तारखेबद्दल सध्या अनेक चर्चा रंगल्या होत्या.आता २७ तारखेला विद्यार्थांना निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहायला मिळणार आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च-एप्रिल २०२४ ही परीक्षा घेण्यात आली होती.