Published On : Mon, May 27th, 2024
By Nagpur Today Nagpur News

खड्डे बुजविण्यासाठी अत्याधुनिक इन्स्टा रोड पॅचर मशीन

Advertisement

नागपूर शहरातील डांबरी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी अत्याधुनिक इन्स्टा रोड पॅचर मशीनची पाहणी सोमवारी (ता.२७) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली. हिस्लॉप कॉलेज समोरील रस्त्यावर ग्रॅम्स इंफ्राटेक प्रा. लिमिटेडद्वारे आयुक्तांपुढे मशीनचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

पावसाळ्यात डांबरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले निदर्शनास येतात. हे खड्डे जलद प्रभावाने बुजविता यावेत यादृष्टीने इन्स्टा रोड पॅचर मशीनचा उपयोग होणार आहे. आय.आर.पी.-जी.आय.पी.एस.ए.टी. अस्फाल्ट टेक्नॉलॉजीवर आधारित इन्स्टा रोड पॅचर मशीनद्वारे कमीत कमी वेळेत खड्डे बुजविण्याचे कार्य होते. कंपनीचे प्रबंध निदेशक श्री. गोविंद बजाज यांनी सांगितले की, छोटे-छोटे ते मोठ्यात मोठे सर्व प्रकारचे खड्डे बुजविण्यास मशीनचा उपयोग होतो. विशेषत: पावसाळ्यामध्ये मशीनमुळे खड्डे बुजविण्यास फायदा होतो.

Advertisement
Wenesday Rate
Wednesday01 Jan. 2025
Gold 24 KT 76,900 /-
Gold 22 KT 71,500 /-
Silver / Kg 86,700 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मशीनचे तंत्रज्ञान पर्यावरणपूरक आहे. दोन वेगवेगळ्या मशीनच्या माध्यमातून कमीत कमीत वेळेत दोन खड्डे दुरुस्त करण्याचे प्रात्यक्षिक मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्यापुढे दाखविण्यात आले.

यावेळी मुख्य अभियंता राजीव गायकवाड, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता श्री.अजय डहाके, श्री. विजय गुरुबक्षाणी, उपअभियंता प्रमोद मोकाडे आणि धरमपेठ झोनचे कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement