नागपूर: शहरात नवतापाच्या पाहिल्याच दिवसापासून नागपुरात विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे.तर विदर्भातील काही जिल्ह्यातील उष्णतेचा पारा 45 ते 47 अंशांच्या घरात पोहोचला आहे.
उष्णतेच्या लाटेने नागपूरकरांच्या अंगाची लाही- लाही झाली.तसेच नव तपाचे पुढील सात दिवस नागपूरकरांसाठी कठीण जाणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले. 29 मे पर्यंत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा दिला आहे. तर यंदाच्या उन्हाळ्यात पहिल्यांदाच विदर्भातील ब्रह्मपुरीत 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
नागपूर वेध शाळेने विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ,वाशिम, अकोला, अमरावती या जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस विदर्भातील तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे पाहता नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.