नागपुर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात उन्हाचा तडाखा वाढल्याने तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अलर्ट दिला आहे. यात नागपूरचाही समावेश आहे. शहरात उष्माघाताने चार जणांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.
नागपूरात मंगळवारी ४४.८ तापमानाची नोंद झालीय. तर आज ॲारेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच नागपुरात उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे विजेच्या ट्रान्सफर्मरला आग लागू नये म्ह्णून कूलर लावण्याची वेळ आली आहे. महावितरण विभागाकडून विजेच्या ट्रान्सफर्मरला कूलर्स लावले आहेत.
उष्माघाताने चार जणांचा मृत्यू-
नागपुरात उष्माघाताने 4 बेघरांच्या मृत्यची नोंद झाली आहे. कळमना, जुनीकामठी आणि पाचपावली पोलिसांच्या हद्दीत 4 जणांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिसांनी केली. उन्हामुळे या बेघरांचा मृत्यू झाल्याची संशय आहे. दरम्यान, मनपाच्या डेथ ऑडिटनंतर यांच्या मृत्यूच्या कारणावर चर्चा करून अहवाल आल्यावर उष्णघातामुळेच हा मृत्यू झाला आहे की नाही हे स्पष्ट होईल.