रायबरेली: लोकसभा निवडणूक निकाल 2024 च्या मतमोजणीला सुरुवात झाली असून देशातील आणि महाराष्ट्रातील जनता कुणाच्या बाजूने उभी आहे हे आज स्पष्ट होणार आहे. रायबरेली लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी १ लाख ४२ हजार ६३० मतांनी आघाडीवर आहेत.
तर, भाजपचे दिनेश प्रताप सिंग ६८ हजार ९९३ मते मिळाली आहेत. सकाळी मतमोजणी सुरू झाली तेव्हा पासून राहुल गांधी हे रायबरेली आणि वायनाड येथून पुढे होते.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे यूपीच्या हायप्रोफाईल लोकसभा सीट रायबरेली येथून भाजप उमेदवार दिनेश प्रताप सिंग यांचा निवडणुकीत पराभव करताना दिसत आहेत. तर केरळमधील वायनाडमधील त्यांचे प्रतिस्पर्धी माकपच्या ॲनी राजा यांच्यापेक्षा त्यांनी मतांमध्ये मोठी आघाडी घेतली आहे.