Advertisement
नागपूर : देशात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून लवकरच कोण विजयी होणार हे स्पष्ट होणार आहे. राहुल गांधी रायबरेली मतदारसंघात २.२५ लाख मतांनी आघाडीवर आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसी मतदारसंघात अवघ्या एक लाख मतांची आघाडी मिळाली आहे.
दरम्यान लोकसभेच्या 543 जागांसाठी सात टप्प्यात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जून रोजी मतदान झाले.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात 102 लोकसभेच्या जागांवर 66.14 टक्के मतदान झाले.
दुसऱ्या टप्प्यात 88 जागांवर 66.71 टक्के मतदान झालं. मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यातील 93 जागांवर 65.68 टक्के मतदान झालंय चौथ्या टप्प्यातील 96 जागांवर 69.16, पाचव्या टप्प्यातील 49 जागांवर 62.2, सहाव्या टप्प्यातील 58 जागांवर 63.37 आणि सातव्या टप्प्यात 63.88 टक्के मतदान झाले.