नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाली. या मतदारसंघात बाराव्या फेरीत नितीन गडीकर 77,959 मतांनी आघाडीवर आहेत. तर काँग्रेस नेते विकास ठाकरे हे पिछाडीवर आहेत.
आतापर्यंत गडकरींना 4,37,267 इतके मते मिळाली तर काँग्रेस नेते विकास ठाकरे यांना 3,59,308 इतकी मते मिळाली.
दरम्यान नागपूरमध्ये भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीयांच्या विरोधात काँग्रेसकडून विकास ठाकरे निवडणूक मैदानात होते.
नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीकरून पाठिंबा दिला होता. तसेच 11 अपक्ष सुद्धा रिंगणात आहेत.