Published On : Thu, Jun 6th, 2024
By Nagpur Today Nagpur News

महाविकास आघाडी विधानसभेत १८५ जागा जिंकणार-संजय राऊतांचा दावा

Advertisement

मुंबई :राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले तर महायुतीला मोठा फटका बसला आहे. यात आता महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे.

यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा करत येत्या विधानसभा निवडणुकीत मविआ १८५ जागा जिंकणार असल्याचे म्हटले आहे. विधानसभेला याहून मोठं यश मिळेल,असे म्हटले.

Gold Rate
05 April 2025
Gold 24 KT 89,100/-
Gold 22 KT 82,900/-
Silver / Kg - 88,600/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अमित शाह यांनी एनडीएची दार चंद्राबाबू नायडूंसाठी बंद आहेत, असे विधान केले होते. मात्र आता त्याच चंद्राबाबूंना यांनी बरोबर घेतले आहे. त्यामुळे हे सरकार आलं तर ते टिकणार नाही. अनैतिक सरकार स्थापन झाल्यानंतर ते पाडून येण्यात मजा आहे ते आत्ता बनवण्यात नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी एनडीएवर टीकास्त्र सोडले.

महायुती सरकारकडून आमच्या जागा चोरण्याचा, विजय चोरण्याचा प्रयत्न झाला. अमोल किर्तीकरांच्या जागेसाठी जो प्रयत्न झाला ते अनेक ठिकाणी झालं. विधानसभा निवडणुकीत ते होणार नाही. आम्ही १८० ते १८५ जागा सहज निवडून येऊ असे राऊत म्हणाले आहेत.

Advertisement
Advertisement