नवी दिल्ली : राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा-पदवीधर (NEET- UG) २०२४ च्या परीक्षेतील वाढीव गुणांबाबत सुरू असलेल्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला.राष्ट्रीय टेस्टींग एजन्सीने 1563 ग्रेस मार्क दिलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
त्यामुळे या विद्यार्थ्यांची 23 जूनला पुन्हा परीक्षा होणार आहे.दुसरीकडे समुपदेशनाची प्रक्रिया वेळापत्रकाप्रमाणे सुरू राहणार असल्याचे निर्देशही न्यायालयाने यावेळी दिले आहेत.
ग्रेस मार्कावरुन पेटला वाद –
एनटीएने NEET UG Examination 2024 परीक्षेत 1563 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिले होते. मात्र या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या ग्रेस मार्कावरुन मोठा वाद पेटला. यासंदर्भात काही पालकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने ग्रेस मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार 23 जूनला ही परीक्षा घेण्यात येणार आहे.