नागपूर: रामदासपेठ फार्मलँड रोडवरील एका कन्स्ट्रक्शन कंपनीच्या जागेवर तळघर बांधण्यासाठी खोदलेल्या ४० फूट खड्ड्याच्या आजूबाजूची जमीन अचानक खचली.या लागतच पार्किंग करण्यात आलेली कारही 40 फूट जमीखाली कोसळल्याचे पाहायला मिळाले.या अपघातामुळे संकुलात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.
रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉइंटसमोर केदार डेव्हलपर कंपनीकडून बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. बेसमेंट पार्किंगसाठी येथे 40 ते 50 फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता.
फार्मलेंड के बहुतांश नागरिक याच रस्त्यावर वाहने पार्क करतात. रात्री 10 च्या दरम्यान अचानक मागील बाजूची जमीन खचू लागली. यादरम्यान एक पोकलेन मशीन बेसमेंटमध्येच उभी होती. मंगलदीप अपार्टमेंटमधील रहिवाशी गुरदीप सिंग पाहुजा यांनी नेहमी प्रमाणे याच ठिकाणी आपली कार पार्क केली. जमीन खचू लागल्याने त्यांची कारही .40 फूट खाली जमिनीत कोसळली. त्यांच्या शेजारी असलेल्या ठक्कर यांची गाडीही याच ठिकाणी पार्क करण्यात आल्याने ती देखील पडणार होती मात्र तेथून तात्काळ गाडी काढण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच बजाज नगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून येथे रात्रंदिवस बांधकामे सुरू असून त्याकडेही दुर्लक्ष होत असल्याचे अपार्टमेंटमधील रहिवाशांनी सांगितले. लगतच्या अपार्टमेंटचे खांबही कोसळल्याची भीती येथील रहिवाश्यांना आहे. नेमकी ही घटना घडण्यामागचे कारण काय? याबाबत बांधकाम कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चुप्पी साधली आहे.