नागपूर : पार्टी करून घरी जात असताना मद्यधुंद महिला चालकाने दोन दुचाकीस्वार युवकांना कारने चिरडल्याची घटना फेब्रुवारी महिन्यात घडली.
मोहम्मद हुसैन गुलाम मुस्तफा (३४, रा. नालसाहब चौक) व मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया (३४, रा. जाफरनगर) असे मृत तरुणांचे नाव आहे. रितिका उर्फ रितू दिनेश मालू असे कारचालक महिलेचे नाव आहे.
रामझुला हिट अँड रन प्रकरणातील आरोपी रितू मालू हिचा पती दिनेश मालूला नागपूर सत्र न्यायालयाने दिलासा दिला. रितू मालू हिला मदत केल्याप्रकरणी प्रथम न्यायदंडाधिकारी यांनी दिनेश मालूचा जामीन मंजूर केला होता. याविरोधात तहसील पोलिसांनी सत्र न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली.
सत्र न्यायालयाने सोमवारी पोलिसांची ही याचिका फेटाळत दिनेश मालूला दिलासा दिला आहे.
दरम्यान रामझुला हिट अँड रन प्रकरणातील आरोपी रितू मालू हिला अपघातानंतर दिनेश मालूने मदत केली असल्याचा आरोप आहे.