मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे, असे असताना राज्य सरकारने आज अर्थसंकल्प सादर केला.त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. वित्त मंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे.
या योजनेनुसार आता पात्र कुटुंबांना वर्षाला तीन सिलिंडर मोफत मिळणार आहे. गॅस सिलिंडर प्रत्येकाला परवडेल यासाठी पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मी जाहीर करत आहे,
असे अजित पवार म्हणाले.ही योजना पर्यावरण संरक्षणाला सहाय्यभूत ठरेल आणि ५२ लाख १६ हजार ४१२ लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येईल,
महिला लघुउद्योजिकांनी १५ लाख रुपयांपर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा शासनाकडून करण्यासाठी आई योजना सुरू करण्यात आली आहे. महिला व बालकांविरोधातील अत्याचाराचे खटले चालवण्यासाठी १०० विशेष जलदगती न्यायालयांना आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.