Advertisement
जालना : समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे.जालन्यातील कडवंची गावाजवळ दोन गाड्यांचा भीषण अपघात झाला.
या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.तर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
माहितीनुसार,नागपूरहुन मुंबईकडे जाणाऱ्या कारला राँग साईडनं येणाऱ्या कारची धडक बसल्यामुळे हा अपघात झाला.जालना जिल्ह्यातील कडवंची गावाजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला.
या अपघातामध्ये सहा जण ठार तर तीन जण जखमी झाले आहेत. एका जखमीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. संध्याकाळी अकराच्या सुमारास नागपूरवरून मुंबईकडे जाणारी आर्टिका आणि राँग साईडने येणाऱ्या स्विफ्ट डिझायरची समोरासमोर धडक झाल्याने हा भीषण अपघात घडला.