Advertisement
मुंबई/नागपूर : रोज हजारो वाहनांची वर्दळ असणाऱ्या नागपूर-कामठी-जबलपूर या राष्ट्रीय महामार्गावर नागपूर महानगर पालिका आणि मेट्रो द्वारे ठिकठिकाणी धोकादायक खोदकाम आणि महामार्गाला लागून खड्डे करण्यात आले.
ज्यामुळे याठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे आणि महामार्गावर प्रवासात वाहनधारकांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
यासंदर्भात राज्य शासनाने तातडीने लक्ष देऊन या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे असा प्रश्न विचारून राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी आज सभागृहात शासनाचे लक्ष वेधले.