Published On : Thu, Jul 4th, 2024
By Nagpur Today Nagpur News

मेयो रुग्णालयात खाली बेड टाकून रुग्णांवर उपचार माजी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सभागृहात उपस्थित केला प्रश्न

मुंबई/नागपूर,: नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय व महाविद्यालय (मेयो) येथे रुग्ण वाढत असल्याने उपचारासाठी बेड मिळविणे मुश्किल झाले आहे. हे रुग्णालय सद्या तुडुंब झाल्याने तिथे रुग्णांकरिता जागा नाही.

मात्र, रुग्ण येत असल्याने खाली बेड टाकून उपचार करण्याची वेळ या रुग्णालयावर आली आहे. येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची अवहेकना होत असल्याने रुग्णांकरिता अतिरिक्त खाटा उपलब्ध करण्याकरिता नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी आज सभागृहात प्रश्न उपस्थित केला.

Gold Rate
Monday 03 Feb. 2025
Gold 24 KT 82,400 /-
Gold 22 KT 76,600 /-
Silver / Kg 93,300 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गरीब रुग्णांसाठी सरकारी रुग्णालय ही जगण्याची अखेरची आशा असते. कारण खासगी रुग्णालयातील दर त्यांना परवडणारे नाहीत. परंतु राज्यातील शासनकर्ते आरोग्यासारखा महत्त्वाचा विषयावर आजही गंभीर नसल्याचे दिसून येत असल्याचा आरोप यावेळी डॉ. राऊत यांनी केला.

Advertisement