नागपूर : शहरातील फ्रेंड्स कॉलनीत येथे गुरुवारी झाडाला लटकलेल्या अवस्थेत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली.
स्थानिक नागरिकांनी मृतदेह पाहिल्यानंतर तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. मृत व्यक्तीची ओळख अद्यापही पटलेली नसून पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमधून हरवलेल्या व्यक्तींच्या अहवालांचे पुनरावलोकन करण्यास सुरुवात केली आहे. तसेच प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.