मुंबई:भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर यांची भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.राहुल द्रविड यांच्या जागेवर ही नियुक्ती करण्यात आली.द्रविड प्रशिक्षक असताना टीम इंडियाने २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकला.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती जाहीर केली. जय शाहने पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली.
गौतम गंभीर याने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत विविध भूमिकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे, मला विश्वास आहे की भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी गौतम हा एक आदर्श व्यक्ती आहे.
भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर गौतम गंभीरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटले की,भारताचा मला अभिमान असून आपल्या देशाची सेवा करणे माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे.मी भारतीयांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघाचा प्रशिक्षक म्हणून पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे गंभीर यांनी म्हटले आहे.