नागपूर : नेपाळमधील चितवन परिसरात भूस्खलन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भूस्खलनानंतर दोन बस त्रिशूली नदीत वाहून गेल्याने सात भारतीय नागरिकांसह किमान ६५ लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार काठमांडूहून निघालेली एंजल बस आणि गौरकडे जाणारी गणपती डिलक्स बसचा शुक्रवारी पहाटे ३.३० च्या सुमारास अपघात झाला.
नारायणघाट-मुगलिंग रस्त्यालगत सिमलताल परिसरात दरड कोसळल्याने प्रवाशांसह दोन्ही बस नदीत वाहून गेल्या.
नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. याबाबत तातडीने शोध आणि बचाव कार्यासाठी निर्देश जारी केले आहेत. देशभरात नुकत्याच आलेल्या पूरामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचा नाश झाला आणि भूस्खलनात प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले हे ऐकून मला खूप वाईट वाटले, असे ते म्हणाले.