नागपूर :शहरातील पारडी फ्लाईओवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास भरधाव दुचाकीस्वाराचा पुलावरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. योगेश्वर भागत चूटे (वाय २६, सलंगटोला ,गोंदिया) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो नागपुरातील सुभान नगर इंदिराबाई तिड़के कॉलनीत राहतो. तो भारत फायनांस मध्ये काम करतो.
माहितीनुसार, योगेश आज शनिवारी दुपारी नव्याने बनवलेल्या पारडी उड्डाणपुलावरून जात असताना त्यांचे दुचाकीवरून नियंत्रण सुटले. यादरम्यान दिशानिर्देशक बोर्ड सकट 40 ते 50 फुटांवरून तो खाली कोसळला. हा अपघात इतका भीषण होता त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पारडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अपघात नेमका कसा घडला याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.