मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळविला तर महविकास आघाडीला मतं फुटीचा फटका बसला.
विधान परिषदेच्या ११ जागांच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीचे ९, तर विरोधी बाकावरील महाविकास आघाडीचे २ उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान केले. त्यामुळे महाविकास आघाडीतील शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला.
झिशान सिद्दीकी, सुलभा खोडके, शिरीष चौधरी, हिरामण खोसकर, जितेश अंतापूरकर, मोहन हंबिर्डे अशी क्रासव्होटिंग करणाऱ्या आमदारांची नावे आहेत.
काँग्रेसच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, सतेज पाटील यांनी या आमदारांच्या पक्षविरोधी कृत्याचा अहवाल दिल्लीला पाठवला आहे त्यामुळे त्यांच्यावर लवकरच निलंबनाची कारवाई होणार असल्याचे समोर आले आहे.