नागपूर: नागपुरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शहर जलमय झाले असून अनेक भागात पाणी साचले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
नागपुरात शनिवारी सकाळी विजांचा कडकडाटासह आणि मुसळधार पावसाने हजेरी लावली. हवामानातील हा बदल शुक्रवारी मध्यरात्रीपासून दिसून आले, त्याचे रुपांतर सकाळपासून मुसळधार पावसात झाले.
नागपुरातील अनेक भागात या पावसामुळे तलावाचे स्वरूप आले असताना यामुळे अनेक भागात चार ते पाच फुटांपर्यंत पाणी तुंबले आहे. या दृश्यांवरून शहारत पावसाळ्यासाठी नागपूर महानगरपालिकेने किती नियोजन केले हे दिसून येते.
या पासवामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. येथील सिताबर्डी परिसर संपूर्ण पाण्याखाली गेला असून येथे असणाऱ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बसगाड्या अर्ध्याहून अधिक पाण्यात बुडालेल्या आहेत. मोरभवन आणि एसबीआय क्वार्टर देखील पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे अनेक भागात वाहतूक कोंडी झाली आहे.