नागपूर :शहरातील कुख्यात गुंड सुमित ठाकूरला जरीपटका पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) अटक करण्यात आली आहे. 9 महिन्यांपासून फरार असलेल्या या गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने सापळा रचून त्याच्या घरातून अटक केली होती. गिट्टीखदान पोलिसांनी त्याचा पीसीआरही घेतला असला तरी न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली .
माहितीनुसार, 17 जुलै रोजी कुख्यात गुन्हेगार सुमित ठाकूर त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गुप्तपणे घरी आला होता. याची माहिती मिळताच गुन्हे शाखेने त्याला अटक केली.
प्रसिद्ध गणेश चाचेरकर उर्फ गुई यांच्या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी त्याला अटक करून 20 जुलैपर्यंत कोठडीत ठेवण्यात आले होते.
20 जुलै रोजी गिट्टीखदान पोलिसांना त्याच्या कोठडीत वाढ करण्यात अपयश आल्याने न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. सुमित व त्याच्या साथीदारांविरुद्ध जरीपटका येथे अपहरणाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सुमित विरोधात मोक्का कारवाई कारण्यात आली. याच कायद्यान्वये त्याला पोलिसांनी अटक करून 26 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.