नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतल्या जाणार्या NEET-UG 24 परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर झाली. NEET-UG चे निकाल पूर्णपणे चुकीचे असून या परीक्षेत पद्धतशीरपणे गैरप्रकार झाला आहे, हे दर्शविणारी पुरेसे पुरावे नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे.
त्यामुळे नीटची पुनर्परीक्षा घेता येणार नाही, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
याचिकाकर्त्यांचे वकील आणि सॉलिसिटर जनरल यांचा युक्तीवाद झाल्यानंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी निकालाचे वाचन केले. सर्वोच्च न्यायालयाने नीट परीक्षेमध्ये झालेल्या अनियमिततेप्रकरणी ८ जुलै २०२४ रोजीच्या अंतरिम आदेशात एनटीए, केंद्र सरकार आणि CBI द्वारे खुलासा मागवला होता. या प्रकरणी सीबीआयचेअतिरिक्त संचालक श्री कृष्णा तपासाच्या स्थिती सांगण्यासाठी न्यायालयात हजर झाले होते. NEET-UG चे निकाल पूर्णपणे चुकीचे आहेत आणि परीक्षेच्या पावित्र्यामध्ये पद्धतशीरपणे उल्लंघन झाले आहे, हे दर्शविणारी पुरेसे पुरावे नाहीत. त्यामुळे NEET ची पुनर्परीक्षा घेता येणार नाही.
नीट पेपरफुटी पाटणा आणि हजारीबाग येथे झाली होती. सीबीआय पेपरफुटीचा तपास सुरू ठेवणार आहे. वैद्यकीय प्रवेशासाठीचे समुपदेशन आणि इतर प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी तसेच भविष्यातील परीक्षा आयोजित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे देईल, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.