Advertisement
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे. लोकसभेच्या निकालानंतर महायुतीमधील बऱ्याच नेत्यांनी घरवापसी केली आहे. तर काही जण पक्षांतर करण्याच्या वाटेवर आहेत.
यातच उद्धव ठाकरे यांनी आता भाजपाला मोठा धक्का दिला.
गोंदियातील एका माजी आमदाराने पुन्हा घरवापसी केली आहे. शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले रमेश कुथे यांनी अखेर शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यामुळे गोंदियातील विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे.
रमेश कुथे यांनी 2019 मध्ये शिवसेनेची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता तब्बल 6 वर्षांनी त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत पुन्हा एकदा शिवसेनेचा झेंडा हाती धरला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर त्यांचा पक्षप्रवेश झाला.