नागपूर : अमरावतीतील विक्रम ढोके यांच्या कुटूंबियांनी आपल्या चिमुकल्यासाठी विकत घेतलेल्या नेस्ले सेरेलेकमध्ये जिवंत अळया आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
महागडे आणि पौष्टिक पदार्थसुद्धा कधी कधी तुमच्या चिमुकल्याच्या जीवाला धोका ठरू शकतात. त्याचेच हे एक उदाहरण आहे. बाजारातून विकत घेतलेले नेस्ले कंपनीचे सेरेलेक त्यांच्या चिमुकल्यासाठी अडचणीचे ठरेल याची कल्पनाही विक्रम ढोके यांना नव्हती.
चिमुकल्यांसाठी बेस्ट खाद्य म्हणजे जाहिरातींच्या आधारे सर्वोत्तम म्हणून दाखवले जाणारे ब्रँड नेस्ले सेरेलेक आहे. यावर प्रत्येक पालकांचा विश्वास आहे.अमरावतीच्या ढोले कुटुंबाने आपल्या स्तनपान करवलेल्या बाळाला फक्त आईचे दूध आणि बाजारातून आणलेले सेरेलेक पाजले. मात्र त्यानंतर चिमुकल्याचा प्रकृती बिघडली. त्याला उलट्यांचा त्रास सुरु झाला. त्यामुळे तो पूर्णपणे खचून गेला.डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्याला फूड पॉइजन झाल्याचे सांगितले. मात्र या चिमुकल्याला फक्त सेरेलेकच देण्यात आले. बाजार नेस्ले सेरेलेक कंपनीने आणलेले सेरेलेकचे पाकीट उघडताच ढोके यांना त्यात अळ्या आढळून आल्या.
संतप्त झालेल्या पालकांनी संबंधित अन्न व औषध विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर विभागाने विषारी पावडरचा नमुना घेऊन तपासणीसाठी पाठवला.
या संदर्भात नेस्ले इंडियाचे प्रवक्ते म्हणाले, आम्ही मुलाच्या पालकांच्या संपर्कात आहोत. तसेच आशा आहे की मूल लवकर बरे होईल.आम्ही त्याच बॅचमधील उत्पादने देखील चाचणीसाठी पाठवली आहेत.
आमच्या ग्राहकांची सुरक्षा आणि आमच्या उत्पादनांची गुणवत्ता आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कच्च्या मालाच्या खरेदीपासून अंतिम उत्पादनापर्यंत आमच्या सर्व उत्पादनांची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आमच्याकडे एक मजबूत प्रक्रिया आहे. आम्ही तुम्हाला खात्री देऊ शकतो की आमची उत्पादने वापरासाठी सुरक्षित असल्याचे नेस्ले म्हणाले.
पण या प्रकारच्या आहारावर अवलंबून असलेल्या लाखो मुलांच्या पालकांच्या मनात असुरक्षिततेची भावना आहे. महत्त्वाचे म्हणजे नेस्ले उत्पादने 660 रुपये किलो या महागड्या दराने विकली जातात हे नाकारता येत नाही.
-नरेंद्र पुरी