Published On : Fri, Aug 2nd, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूरची अंतिम मतदार यादी २७ ऑगस्टला प्रसिद्ध होणार

Advertisement

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या काळात लोकांनी प्रचंड गोंधळ पाहिला. मतदार यादीतून नावे गायब असल्याने अनेकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. यापार्श्वभूमीवर नागपूरच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी छायाचित्र मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. आता अंतिम मतदार यादी 20 ऑगस्ट ऐवजी 27 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

सुधारित कार्यक्रमानुसार 2 ते 16 ऑगस्ट दरम्यान नागरिकांकडून दावे व हरकती मागविण्यात आल्या आहेत.

पात्र नागरिकांनी नवीन मतदार नोंदणी, दुरूस्ती, विहित नमुन्यातील वगळण्यासाठी तसेच जास्तीत जास्त मतदारांनी नोंदणी करण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी केले आहे. प्राप्त दावे व हरकती 26 ऑगस्टपर्यंत निकाली काढण्यात येतील.

Advertisement

भारतीय निवडणूक आयोगाने प्रत्येक जिल्हा प्रशासनाला अंतिम मतदार यादीत कोणतीही चूक होणार नाही आणि कोणीही आपले मत देण्यास चुकू नये यासाठी वेळोवेळी मतदार यादीचे पुनरावलोकन करण्यास सांगितले.