नागपूर : राज्य सरकारकडून शहरातील गोर-गरीब बेघर जनतेला आता हक्काची जमीन देण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.ते नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना निर्णय घेऊन झोपडपट्टीमध्ये जे लोक वर्षानुवर्षे राहत आहे. त्यांना राहत्या जमिनीवरच मालकी हक्काचा पट्टा देण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा नागपूरत मोठी कारवाई केली होती. नंतर काही अडथळे आले.
आता आम्ही ते दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. खाजगी जमिनीवरील झोपडपट्टीचा प्रश्न होता. नव्याने 2022 ला सरकार आल्यानंतर तो आम्ही सोडवला आहे.
टीडीआर देऊन त्या जमिनी अधिकृत करण्याचा आणि तिथल्या झोपडपट्टीवासियांना मालकी हक्क देण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यानुसारच आज काही जणांना मालकी हक्काचे अधिकार दिले आहे. पुढेही हजारो गरिबांना जमिनीचा हक्क आम्ही देणार आहोत, असे फडणवीस म्हणाले.